धावणारे की उभे रहाणारे, पावसात लवकर कोण भिजेल?

रिसर्चनुसार पावसात वेगाने धावणारी व्यक्ती लवकर भिजते. आता हे कसे घडते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?

संशोधनानुसार, पावसात एका जागी उभी राहणारी व्यक्ती पळून जाणाऱ्यापेक्षा उशिरा भिजते. होय, तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरे आहे.

२०१२ मध्ये इटालियन भौतिकशास्त्रज्ञ फ्रँको बोची यांनी ‘युरोपियन जर्नल ऑफ फिजिक्स’ मध्ये या विषयावर संशोधन केलं.

त्यांच्या संशोधनात पावसात न भिजण्यासाठी धावणे हा चांगला पर्याय नसल्याचे समोर आले आहे.

पाऊस अचानक आला आणि पावसापासून वाचण्यासाठी जवळपास जागा नसेल. त्या स्थितीत तुम्ही चालण्या किंवा धावण्याऐवजी एका जागी उभे राहिल्यास तुम्ही ओले कमी व्हाल.

फ्रँकोने म्हटले आहे की समजा सामान्य परिस्थितीत पाऊस पडत आहे आणि वादळ नाही. अशा स्थितीत थेंब थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात.

या स्थितीत काय होईल, जो माणूस एका जागी उभा असेल, त्याच्या डोकं आणि खांद्यावर ठराविक प्रमाणात पाणी पडेल. परंतु या काळात जोरदार वारा किंवा वादळ नसावा.

संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती  वेगाने धावते किंवा चालते तेव्हा डोक्यावर आणि खांद्याशिवाय त्याच्या हालचालीमुळे शरीराच्या इतर भागावर देखील पाणी पडतं.

याचाच अर्थ व्यक्तीच्या शरीरावर पडणाऱ्या थेंबांची संख्या वाढते. धावल्यामुळे शरीराचे इतर भागही पाण्याच्या संपर्कात येतात, त्यामुळे व्यक्ती लवकर भिजते.