'या' झाडापासून तयार होते साबूदाणा, तुम्हाला हे माहित होतं का?

उपवास म्हटलं की साबूदाणा खिचडी ही आलीच.

साबुदाण्यापासून बनवलेले अनेक पदार्थ उपवासात खाल्ले जातात. त्याशिवाय उपवास अपूर्ण वाटतो.

पण तुम्हाला माहित आहे का की हे असे अन्न आहे जे शेतात किंवा झाडावर उगवत नाही

आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न उपस्थीत झाले असतील की हे नक्की कशापासून तयार होतं?

खरंतर साबूदाणा एका प्रकारच्या झाडाच्या चिकापासून तयार केलं जातं.

ज्या झाडापासून साबुदाणा बनवला जातो त्याचे नाव सागो पाम आहे.

साबुदाण्याचे झाड ताडाच्या झाडासारखे आहे.

हे झाड मूळचं पूर्व आफ्रिकेचं आहे.

याचं चिक काढून त्याला अनेक दिवस पाण्यात ठेवलं जातं आणि नंतर त्याचे बॉल बनवले जातात, ज्याला आपण साबूदाणा म्हणतो.