सचिन सुप्रियाच्या वयात आहे इतक्या वर्षांचं अंतर!

मराठीच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर.

सचिन आणि सुप्रियाची पहिली भेट ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनीच दिग्दर्शित केला आहे.सचिन यांची सह कलाकार म्हणून सुप्रियाची निवड झाली होती.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटामुळेच दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.

त्यांनतर त्यांनी लगेच 1985 मध्ये लग्नसुद्धा करण्याचं ठरवलं होतं. मात्र सुप्रिया या केवळ 17 वर्षांच्या होत्या. तर सचिन 27 वर्षांचे होते.

या दोघांच्या वयात एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांचं अंतर होतं.

त्यामुळे सर्वांनाचं असं वाटायचं की हे नातं फार काळ टिकणार नाही.

मात्र या जोडीने सर्वांनाचं चुकीचं ठरवलं. त्यांच्या प्रेमाने त्यांच्या नात्यात कधी वयाची अडचण होऊ दिली नाही.

आज जवळजवळ 38 वर्षे झालं ते अगदी आनंदाने संसार करत आहेत.