बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी कोट्यवधी मानधन घेतो भाईजान! 

सलमान खान बॉलिवूडवर राज्य करतो. 

याशिवाय सलमान टेलिव्हिजनवर सुद्धा राज्य करतो. 

तो गेली अनेक वर्ष बिग बॉस या शोचं सूत्रसंचालन करत आहे. 

सलमान खानमुळे बिग बॉसला वेगळी ओळख आहे. 

सलमान खान दर आठवड्याला स्पर्धकांचं कौतुक करण्यासोबतच त्यांची शाळा घेतो. 

पण हे काम करण्यासाठी सलमान खान दर आठवड्याला मोठी फी आकारतो. 

बिग बॉस 17 साठी सलमान खानने प्रत्येक एपिसोडसाठी ६ कोटी रुपये आकारले आहेत. 

म्हणजेच दर आठवड्याला सलमान खान 12 कोटी रुपये आकारणार असल्याची माहिती आहे. 

सलमान खान या सीझनसाठी 200 कोटी आकारणार असल्याची माहिती आहे.