कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का?
प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सामोस्याची बांधणी केली जाते आणि त्याची तळण्याची पद्धतही वेगळी असते.
त्यामुळे त्याच्या चवी मधे मोठा बदल हा खवय्यांना जाणवत असतो.
बीडमधील स्टेडियम रोड परिसरात एक रेस्टॉरंट असून येथील समोसा खूप प्रसिद्ध आहे.
बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये अनेक खवय्यांना हवेहवेसी वाटणारी स्नॅक सेंटर आणि रेस्टॉरंट आहेत.
इथं अनेक विविध प्रकारचे पदार्थ मिळतात.
यामधील स्वराष्ट्र स्वीट होम मध्ये मिळणाऱ्या गरमागरम समोस्याची चव काही न्यारीच आहे.
विशेष म्हणजे हा समोसा कांदा लसूण विरहित असून सुद्धा याची चव अप्रतिम लागते.
त्यामुळे खवय्ये या ठिकाणी हा सामोसा खाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास मोठी गर्दी करतात.
मुंबईतील फेमस मसाला मार्केट
Learn more