श्री गणेशाला दूर्वा का प्रिय आहेत?

Floral Separator

श्री गणेशाला हिंदू धर्मातील प्रथम देवता मानलं जातं.

गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यानं तो लवकर प्रसन्न होतो.

पौराणिक कथेनुसार, एकदा बाप्पाने अनलासुराला गिळले होते.

राक्षस गिळल्यानंतर बाप्पाच्या पोटात प्रचंड जळजळ होत होती.

दुर्वा खाल्ल्यानंतर गणपतीच्या पोटातील जळजळ कमी झाली.

पंडितांच्या मते, तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्यास सुरुवात झाली.

कोणतेही शुभ कार्य हळद आणि दूर्वांशिवाय पूर्ण मानले जात नाही.

दूर्वा नेहमी मंदिर परिसर, बाग किंवा स्वच्छ ठिकाणाहूनच तोडून आणाव्या.

गणेशाला दुर्वा अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा.