शुभमन कोणत्या साराला डेट करतोय? सारा अली खानने सगळं सांगितलं

करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण सीझन 8’ सुरू झाला आहे.

करणच्या या शो मध्ये आगामी भागात बॉलिवूडच्या अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे दिसणार आहेत.

यात दोघीही एकमेकांविषयी अनेक गुपितं उलगडणार आहेत.

सारा अली खान क्रिकेट शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक वर्षांपासून रंगल्या होत्या.

आता साराने अखेर या चर्चांवर मौन सोडत शुभमन नक्की कोणाला डेट करत आहे याविषयी खुलासा केला आहे.

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर शोचा नवीन प्रोमो पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सारा अली खान आणि अनन्या पांडेसोबत बोलताना दिसत आहे.

करणने साराला विचारलं, तुझ्या आणि शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप अफवा आहेत, याला साराने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

याविषयी बोलताना सारा म्हणाली, ‘तू चुकीच्या साराला हा प्रश्न विचारला आहेस. सगळी दुनिया चुकीच्या साराच्या मागे लागली आहे.’ हे ऐकून दोघीही हसू लागतात.

यावरून साराने शुभमन गिल तिला नाही सचिन तेंडुलकरची मुलगी साराला डेट करत असल्याचा इशारा दिला आहे.