फळविक्रीमधून बांधला 50 लाख रुपयांचा बंगला

फळविक्रीमधून बांधला 50 लाख रुपयांचा बंगला

काही जण असे असतात, जे परिस्थिती कितीही हलाखाची असली, तरी त्यावर मात करतात. आज अशाच व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

ज्यांनी तब्बल 30 वर्षे फुटपाथवर फळेविक्री केली आणि आज त्यांनी तब्बल 50 लाख रुपयांचा बंगला बांधला आहे. धोंडीराम हांडे असे या व्यक्तीचे नाव आहे.

धोंडीराम हांडे यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आणि घरची परिस्थिती साधारण असल्याने 1984 मध्ये सातारा शहरात धाव घेतली.

दहावीचे शिक्षण झालेले धोंडीराम यांनी 300 रुपये पगारावर फळाच्या दुकानात कामाला सुरुवात केली. यानंतर एक ते दीड वर्ष फळाच्या दुकानांमध्ये काम केले.

यानंतर फळ व्यवसायाची संपूर्ण माहिती आणि अभ्यास केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. फळ विक्री करत असताना व्यवसायामध्ये चढ-उतार होत होता.

दिवसाला त्यांना 50 ते 100 रुपये फळ व्यवसाय मधून मिळू लागले आणि त्यांचा व्यवसाय सुरू झाला.

व्यवसायामध्ये अनेक अडचणींवर त्यांनी मात केली. खिशात मोठे भांडवल नव्हते. पण फळ व्यवसायाचा अभ्यास दांडगा असल्याने त्यांनी हार मानली नाही.

आज त्यांनी तब्बल 50 लाख रुपयांचा बंगला बांधला आहे.

हमाल कसा झाला उद्योगपती?