2 एकर दुष्काळी शेतीतून 75 लाखांचं उत्पन्न

2 एकर दुष्काळी शेतीतून 75 लाखांचं उत्पन्न

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरीही चांगले उत्पन्न मिळवत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील शेतकरी जालिंदर सोळसकर हे दुष्काळी भागातील प्रयोगशील शेतकरी आहेत. 

शेती आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते तरकारी पिकांची शेती करतात.

कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे सोळसकर यांनी 2 एकर शेतीत शिमला मिरची लावली. 

ढोबळी मिरचीची लागवड करून 5 महिने झाले असून 5 महिन्यांमध्ये 13 वेळा तोडणी झाली आहे.

आतापर्यंत 150 टन मालाची तोडणी झाली असून तब्बल 75 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. 

10 लाख रुपये खर्च वजा जाता 2 एकरात 65 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. 

सोळसकर यांची दुष्काळी भागातील ही शेती अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे. 

हमाल कसा झाला उद्योगपती?