देशात पहिल्यांदाच पिकतेय पांढरी स्ट्रॉबेरी

देशात पहिल्यांदाच पिकतेय पांढरी स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लाल आणि चवीने थोडी आंबट हे आपल्याला माहिती आहे. 

साताऱ्यातील महाबळेश्वर, भीलार, वाई भागात याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जाते.

साताऱ्यातील वाई फुलेनगर येथील शेतकरी उमेश खामकर यांनी चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केलीय.  

शेतीत एक वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी अर्ध्या एकरात ही स्ट्रॉबेरीची लागवड केली. 

पांढरी स्ट्रॉबेरी विकण्यासही त्यांनी सुरुवात केली असून लवकरच ऑनलाईन विक्रीही होणार आहे. 

लाल स्ट्रॉबेरीला 250 रुपये तर पांढरी स्ट्रॉबेरीला 1 हजार ते 1500 रुपये किलो भाव मिळतो आहे.

भारतातील हा पहिला प्रयोग असून फ्लोरिडा पर्ल जातीची स्ट्रॉबेरी पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये पिकवली.

फ्लोरिडा विद्यापीठाकडून रॉयल्टी राइट्स घेतल्याने देशात हे पीक घेण्यासाठी खामकर यांची परवानगी लागेल.