झेंडूच्या फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते. त्यामुळे सध्याचा घडीला बाजारपेठेत झेंडूंच्या फुलांना मोठी मागणी आहे.
यामुळे अनेक शेतकरी आता पारंपारिक शेती न करता झेंडूच्या फुलांची शेती करण्याला प्राधान्य देत आहेत.
साताऱ्यातील शेतकरी वैभव माने यांनी टपोरा भगवा झेंडू याची लागवड केली आहे. यामधून त्यांना दिवसाला 1 लाख रुपये उत्पन्न होत आहे.
साताऱ्यातील रहिमतपूरमधील शेतकरी वैभव माने यांनी 14 एकरमध्ये टपोरा भगवा झेंडू याची लागवड केली आहे.
घरच्यांचा विरोध पत्करुन केली रेशीम शेती, महिन्याकाठी आता 4 लाखांचे उत्पन्न, Video
लागवडीला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. 15 दिवस झाले फुलांची तोडणी देखील सुरू झाली आहे.
दिवसाला दीड टन फुलांची तोडणी वैभव माने करत आहेत. ही फुले कॅरेट किंवा बास्केटमध्ये भरून मुंबई मार्केट किंवा पुणे मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात.
सध्याच्या फुलाच्या बाजारभावाने 80 ते 140 रुपये किलो झेंडूच्या फुलाना दर मिळत आहे.
दिवसाला झेंडूच्या फुलाचे दीड टन तोडणी होते किंवा जास्त देखील होत असते.
त्यामुळे 1 लाख रुपये दिवसाचे उत्पन्न वैभव माने फुलांमधून घेत आहेत.
देशात पहिल्यांदाच पिकतेय पांढरी स्ट्रॉबेरी