एकदा चार्जिंग केल्यानंतर 90 किलोमीटर धावते 'ही' ई-बायसिकल

एकदा चार्जिंग केल्यानंतर 90 किलोमीटर धावते 'ही' ई-बायसिकल

असं म्हटलं जातं की ग्रामीण भागातील मुलांच्या टॅलेंटला तोड नाही.

याचाच प्रत्यय साताऱ्यामध्ये आयटीआयच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या श्रेयस चव्हाण याच्या माध्यमातून आलाय.

श्रेयसने तब्बल 90 किलोमीटर चालणारी चार्जिंगवरील ई-बायसिकल बनवली असून ही ई-बायसिकल पेंडल मारून देखील चार्जिंग होते.

ही चार्जिंग वरील ई-बायसिकल बनवण्यासाठी श्रेयसला दीड महिना कालावधी लागला आहे.

श्रेयस विजय चव्हाण हा कोरेगाव तालुक्यातील छोट्याश्या असणाऱ्या दहिगाव गावातील आहे.

तो लोणंद येथील आयटीआयच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. खडतर परिश्रम करून श्रेयसनी ही सायकल बनवली आहे.

पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणून श्रेयस एक प्रोजेक्ट हाती घेतला आणि चार्जिंग वरची ई-बायसिकल सायकल बनवली.

ई-बायसिकल तयार करताना 30 ते 40 हजार रुपये एवढा खर्च देखील आला आहे.

9 रुपायांची कमाई ते कोट्यवधींचा बिझनेस