शिवकालीन होन अन् शिवराईचा खजिना

शिवकालीन होन अन् शिवराईचा खजिना

नाणी हे इतिहासाचे प्रमुख साधन असून छत्रपती शिवरायांच्या नाण्यांबाबत सर्वांनाच कुतुहल असते. 

याच दूर्मिळ नाण्यांचा संग्रह साताऱ्यातील वाईचे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी केला आहे. 

गेल्या 22 वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला असून त्यांच्याकडे 1200 हून अधिक नाण्यांचा संग्रह आहे. 

तसेच बनकर यांनी शिवकालीन शस्त्रांचा संग्रह आणि संवर्धन केले आहे. 

छत्रपती शिवरायांचा 1674 साली रायगडावर राज्याभिषेक झाला. तेव्हा चलनात दोन प्रकारची नाणी आणली. 

होन हे सोन्यापासून बनवले होते तर दुसरे नाणे शिवराई तांब्यापासून बनवले होते. 

हे चलन रायगडावर बनवल्याने त्याला रायगड मिंट डॉटेड बॉर्डर शिवराई म्हटले जाते. 

बनकर यांच्या संग्रहात शिवकालीन नाण्यांसोबत मराठेकालीन आणि इतर नाणीही आहेत.