अभिनेत्री करीना कपूर आणि शाहीद कपूर रिलेशनमध्ये होते. जब वी मेट सिनेमानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर करीनानं सैफ अली खानबरोबर लग्न केलं. तर शाहीदनं मीरा राजपूतबरोबर संसार थाटला.
अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण हे सीरियस रिलेशनमध्ये होते. दोघांनी बचना ये हसीनो, ये जवानी हैं दिवानी सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात एकत्र काम केलं. दीपिकानं रणबीरच्या नावाचा टॅटू देखील केला होता. पण काही महिन्यात दोघांचं ब्रेकअप झालं. दोघांचं ब्रेकअप चाहत्यांसाठी अत्यंत शॉकिंग होतं.
अभिनेता जॉन इब्राहिम आणि बिपाशा बासू यांचं देखील अफेअर होतं. दोघांच्या प्रेमाची आणि फिटनेसच्या चर्चा नेहमी सुरू असतायच्या. दोघे 10 वर्ष लाँग टाइम रिलेशनमध्ये होते. दोघांचं वेगळं होणं देखील चाहत्यांसाठी धक्कादायक होतं.
अभिनेता उदय चोप्रा आणि नरगिस फाकरी यांनी त्यांच्या नात्याविषयी कधीच खुलेपणानं भाष्य केलं नव्हतं. पण ते 2 वर्ष रिलेशनमध्ये होते.
अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय देखील सीरियस रिलेशनमध्ये होते. दोघांनी एकत्र हम दिल दे चुके सनम सारखा रोमँटिक सिनेमा केला होता. पण ऐश्वर्यानं सलमानबरोबर ब्रेकअप केला असं म्हणतात. सलमान ऐश्वर्याला शारीरिक त्रास देत होता असं ऐश्वर्यानं सांगितलं होतं.