शनीचा अशा लोकांवर होतो कोप
शनी हा ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्या व्यक्ती जीवनात चांगलं काम करतात, त्यांना चांगलं फळ मिळतं.
शनीची अशुभ छाया ज्याच्यावर पडते त्याचे कोणतेही कार्य सफल होऊ शकत नाही.
शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये, म्हणून काही गोष्टी आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्या.
शनिदेव कोपतात तेव्हा माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
जे लोक मोकाट प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांचा छळ करतात, त्यांना विनाकारण मारतात, अशा लोकांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.
जे लोक अस्वच्छता पसरवतात आणि अस्वच्छतेत राहतात त्यांना शनीची कृपा कधीच मिळत नाही.
शनिदेवाच्या अशुभ छायेमुळे अशा लोकांना आजार, अडचणी, आर्थिक तंगी, अपयशाचा सामना करावा लागतो.
जे स्वतःच्या फायद्यासाठी गरीब, लाचारांचे नुकसान करतात, वाईट कृत्ये, चोरी आणि फसवणूक करणाऱ्यांना शनि आयुष्यभर शिक्षा देतो.
ज्या व्यक्ती पाठीमागे इतरांबद्दल वाईट बोलतात आणि खोटं बोलतात त्यांच्यावरही शनिदेवाचा कोप होतो.
ज्या ठिकाणी ज्येष्ठांचा अपमान होतो, आईशी अपशब्द वापरणार्याला शनीच्या कोपाचे धनी बनावे लागते.