शनीची कृपा करेल पूर्ण इच्छा, शनिदेवाला 'या' 3 राशी आहेत अत्यंत प्रिय
ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं की, शनिदेवाला 3 राशी सर्वात जास्त प्रिय आहेत आणि या राशींवर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो.
प्रगतीत अडथळे येऊ नये म्हणून अनेकजण शनिवारी शनिदेवाची पूजा करतात. यामुळे साडेसातीपासून आणि महादशेपासून देखील आराम मिळतो.
तूळ (Libra) ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक म्हणजे तूळ. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते.
तूळ राशीच्या लोकांमध्ये तीव्र इच्छाशक्ती आणि लक्ष्य मिळवण्याची क्षमता असते. तूळ राशीवर शनिदेव नेहमी प्रसन्न असतात, असं म्हणतात. या राशीच्या लोकांना जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.
धनु (Sagittarius) धनु राशीच्या लोकांना आयुष्यभर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद लाभतो, असं म्हणतात. शनिदेव नेहमी या राशीच्या लोकांचं रक्षण करतात.
या राशीचे लोक त्यांच्या मार्गात येणारी कोणतीही समस्या टाळण्यास सक्षम असतात. शनिदेवाच्या कृपेने या लोकांना धनाची प्राप्ती होते आणि शनीच्या कृपेने त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
मकर (Capricorn) मकर राशीच्या लोकांनाही शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. या राशीचे लोक शनिदेवाच्या कृपेने त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होतात.
शनिदेवाच्या कृपेने ते आपले महत्त्वाचे काम अगदी सहजतेने पूर्ण करू शकतात. या लोकांना शनिदेवाची पूजा केल्याने खूप फायदा होतो.
वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही.