मसाले दुधाशिवाय कोजागिरीच्या रात्री या 8 स्पेशल डिशेश बनवू शकता

शरद पौर्णिमा, ज्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते, हा भारताच्या विविध भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे.

आश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री कोजागिरी असते. लोक दिवसभर पौर्णिमेचा उपवास करतात आणि चंद्रोदयानंतर तो सोडतात.

शरद पौर्णिमेनिमित्त तुम्ही घरीच तयार करू शकाल, अशा 8 स्वादिष्ट पदार्थांवर एक नजर टाकुया.

Rice Kheer

कोजागिरी पौर्णिमेला तांदळाची खीर हवीच. तांदूळ, दूध, साखर आणि मसाले घट्ट होईपर्यंत उकळवून तयार केली जाते. नंतर वरून बदाम-पिस्त्याने सजवून खायला घ्या.

Masala Doodh

कोजागिरी पौर्णिमेला मसाले दुधाचा आस्वाद अनेकजण घेतात. कोमट, सुगंधित मसाला दूध हे उत्तम पेय आहे.

Doodh Poha

दूध आणि साखर घालून बनवलेले गोड दूध पोहे, हा पदार्थही तुम्ही कोजागिरीनिमित्त बनवू शकता. ज्याचा तुम्ही पौर्णिमेच्या रात्री आनंद घेऊ शकता.

Sabudana Khichdi

साबुदाणा खिचडी - साबुदाणा मोती, बटाटे, शेंगदाणे आणि मसाले एकत्र करून हा एक चवदार पदार्थ तयार होतो. जर तुम्ही शरद पौर्णिमेला उपवास करत असाल तर खाण्यासाठी एक स्वादिष्ट, पोटभरी हा पदार्थ ठरेल.

Coconut Ladoo

शरद पौर्णिमेसाठी हा आणखी एक गोड पदार्थ आहे. किसलेले खोबरे, कंडेन्स्ड मिल्क आणि विविध ड्रायफ्रुटसनं सजवलेले खोबऱ्याचे लाडू खाऊ शकता.

Puran Poli

पुरण पोळी विषयी महाराष्ट्रातील लोकांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. सण आणि पुरण पोळी समीकरण ठरलेलं असतं. कोजागिरीनिमित्तही आपण पुरण पोळी करू शकता.

Moong Dal Halwa

मूग डाळ हलवा - मूग डाळ, साखर, तूप आणि ड्रायफ्रुटसनं सजवलं जाणारं एक पारंपारिक मिष्टान्न. कोजागिरीच्या रात्री याची चव घेऊ शकता.

Basundi

कंडेन्स्ड मिल्क डेझर्ट, ड्रायफ्रुट्स घालून बासुंदीचा आस्वाद घेणं लाजवाब, कोजागिरीच्या रात्री थंड बासुंदी मजेदार वाटेल.