'या' अटीवर पतौडींसोबत लग्नाला तयार झाली होती शर्मिला टागोर

शर्मिला टागोर या 70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

आपल्या करिअरमध्ये त्यांनी ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूडला दिले.

शर्मिला यांनी 1968मध्ये मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न केलं.

लग्नाआधी दोघांच्या अफेअर्सच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.

दोघेही एका कॉमन मित्राच्या माध्यमातून भेटले होते. 

मंजूर अली खान यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शर्मिला यांनी एक अट ठेवली होती.

शर्मिला यांना लग्नासाठी तयार करायला मंसूर अली खान यांना खूप पापड लाटावे लागले होते.

 3 बॉलमध्ये सलग 3 षटकार लगावले तर तुमच्याशी लग्न करेन अशी अट शर्मिला यांची होती. 

दुसऱ्या दिवशी मंसूर अली खान पतौडी यांनी 3 बॉलमध्ये सलग 3 षटकार मारून शर्मिला यांचं मनं जिंकलं होतं.