महादेवाला बेलपत्र वाहण्याची ही योग्य पद्धत

सनातन धर्मात महादेवाला अत्यंत प्रभावशाली देवता मानलं जातं.

दर सोमवारी महादेवाची पूजा केली जाते आणि भोलेनाथाला आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.

महादेवाच्या आवडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे बेलपत्र, ज्याला बिल्वपत्र देखील म्हणतात.

बेलपत्र अर्पण करण्याबाबत हिंदू धर्मात अनेक नियम सांगितले आहेत.

शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यासाठी बेलाची स्वच्छ पाने घ्या.

अर्पण करण्यापूर्वी पानाचा गुळगुळीत भाग नीट पाहून घ्या.

तो भाग शिवलिंगाला स्पर्श होईल असा ठेवा.

अर्पण करण्यासाठी 1, 3 किंवा 5 पानांचा बेल असावा, असे हिंदू धर्मात सांगितले आहे.

बेलपत्राला एका पेक्षा जास्त पाने असतील तितकी ती अधिक शुभ मानली जातात.