April 4th, 2020 09:00 AM

2118 Thornridge Cir. Syracuse, Connecticut 35624

शिव ठाकरेच्या घरी विराजमान होणार वर्दीतील बाप्पा!

शिव ठाकरे चाहत्यांचा आवडता कलाकार आहे.

उद्या गणेश चतुर्थी असून शिवच्या घरी देखील बाप्पाचं आगमन होणार आहे. 

शिवच्या घरी यंदा चक्क वर्दीतील म्हणजेच पोलिसांच्या वेशातील बाप्पा घरी येणार आहे. 

नुकतंच शिव ठाकरेने पोलिसांचा गणवेश परिधान केलेला गणपती बाप्पा घरी आणला आहे. 

या कृतीमधून त्याने मुंबई पोलिसांना मानवंदना दिली.

शिव ठाकरेने पोलीस थीम असलेला गणपती बाप्पा धूमधडाक्यात घरी आणला. 

या उत्सवात ५० पोलिसांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. 

शिव ठाकरेचा हा बाप्पा पाहून चाहते भारावले आहेत. 

शिवच्या या कृतीने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.