श्रावण शुक्रवार : असं करा जरा जिवंतिका पूजन

मराठी महिन्यातील श्रावण हा अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. 

व्रत वैकल्ये आणि सणांनी परिपूर्ण असा महिना  महादेवाला समर्पित मानला जातो

या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन करण्याची प्रथा आहे. 

सकाळी पुरणाचा नैवेद्य जिवतीमातेला दाखवून कापसाचे वस्त्र वाहून आरती करतात. 

घरातील तान्ह्या बाळाचे रक्षण जिवती आई करते, असे मानले जाते.

सायंकाळी सुवासिनींना गूळ फुटाणे व दूध देऊन हळदी-कुंकू करतात.

श्रावणात जरा जिवंतिका पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. 

या महिन्यात घरोघरी श्री सत्यनारायण पूजन करण्याची परंपरा आहे.

सूचना - ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला शास्त्रीय पुरावा नाही.