चला हवा येऊ द्या नंतर भाऊ कदमबरोबर दिसली श्रेया बुगडे!

अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या लंडनमध्ये आहे.

चला हवा येऊ द्यानंतर श्रेया मित्रांबरोबर लंडनला गेली आहे.

लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणांना श्रेयानं भेट दिली.

लंडनच्या रस्त्यावरील फोटो श्रेयानं शेअर केलेत.

लंडनमध्ये श्रेयाबरोबर अभिनेता भाऊ कदम देखील गेला आहे.

हवा येऊ द्या संपल्यानंतर श्रेया आणि भाऊ पहिल्यांदा एकत्र दिसले आहेत.

श्रेया नेमकी लंडनमध्ये कशासाठी गेली आहे याची माहिती समोर आलेली नाही.

श्रेयानं काही महिन्यांआधीच तिचं बिग फिश नावाचं हॉटेल सुरू केलं.

चला हवा येऊ द्यानंतर श्रेया कोणत्या कलाकृतीत दिसणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.