अल्कोहोल पेक्षाही जास्त नुकसानदायक ठरतो ॲपल ज्यूस? काय सांगतात तज्ज्ञ...
अनेकजण ॲपल ज्यूस हा हेल्दी म्हणून त्याचे सेवन करतात.
मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्याप्रकारे दारू शरीरासाठी अपायकारक ठरते तसेच ॲपल ज्यूस सुद्धा शरीरासाठी नुकसानदायी ठरतो.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात माजी न्यूरोएंडो क्रायनोलॉजिस्ट लोबर्ट लस्टिंग सांगतात की लहान मुलांना सुद्धा फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.
लहान मुलांमध्ये ही समस्या यामुळे होते कारण ते ॲपल ज्यूस पितात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ॲपल ज्यूस हा दारू प्रमाणे मेटाब्लाईज्ड होतो.
ॲपल ज्यूसमध्ये फ्रक्टोज आणि ग्लूकोज ऐवजी अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते.
जर ॲपल ज्यूसचे सेवन जास्त केले तर यात आढळणारी शुगर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
ॲपल ज्यूसमुळे रक्तातील शुगर वेगाने वाढते, ज्यामुळे डायबेटिज होण्याचा धोका असतो.
ॲपल ज्यूसच्या जास्त सेवनामुळे शरीरात फ्रक्टोजच प्रमाण वाढून फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.
तसेच ॲपल ज्यूसच्या सेवनामुळे वजन वाढीची समस्या सुद्धा होऊ शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)