नारळात स्ट्रॉ टाकून पाणी पिता? हे दुष्परिणामही वाचाच!

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

मात्र, शहाळ्यात स्ट्रॉ टाकून थेट पाणी पिऊ नये.

आहारतज्ञांच्या मते, प्रथम एका ग्लासमध्ये नारळाचे पाणी काढा.

यानंतर नारळाचे पाणी गाळून मग ते पाणी प्या.

खरं तर, नारळाच्या आत अनेक वेळा धोकादायक बुरशी जमा होते आणि ती आपल्याला दिसत नाही.

थेट स्ट्रॉ टाकून प्यायल्यास ही बुरशी पाण्यासोबत लोकांच्या शरीरात पोहोचू शकते.

यामुळे, लोकांना गंभीर ऍलर्जी आणि श्वसन समस्या होऊ शकतात.

बुरशीमुळेही लोकांसाठी जौवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे लोकांनी थेट नारळात स्ट्रॉ टाकून पाणी पिणे टाळावे.