Kiss केल्याने होऊ शकतात गंभीर आजार, करण्यापूर्वी करा विचार

Kiss करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, त्यामुळे कॅलरीज बर्न होतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

परंतू वारंवार ओठांचे चुंबन घेतल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकता.

ईएनटी सर्जन डॉ. बृजपाल त्यागी सांगतात की, कोणाच्याही ओठांना ओठांनी स्पर्श करण्याआधी ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी आहे का, याची खात्री करून घ्या.

इन्फ्लूएंझा हा श्वासासंबंधित विषाणूजन्य आजार आहे, जो किस केल्याने मोठ्याप्रमाणात पसरतो.

इन्फ्लूएंझाने पीडित असलेल्या व्यक्तीला आपण किस केलंत तर हा विषाणू आपल्या शरिरात प्रवेश करू शकतो. यामध्ये थकवा, अंगदुखी, घसादुखी, ताप, इत्यादी लक्षणं जाणवतात.

पार्टनरला डीप किस केल्यानंतर हर्पिस हा आजार होऊ शकतो. हर्पिसमध्ये व्यक्तीच्या तोंडात लाल किंवा पांढरे फोड येतात.

पार्टनरला डीप किस केल्यानंतर हर्पिस हा आजार होऊ शकतो. हर्पिसमध्ये व्यक्तीच्या तोंडात लाल किंवा पांढरे फोड येतात.

hs1 आणि hs2 या दोन प्रकारच्या विषाणूंमुळे हा आजार पसरतो. किसमधून त्याचा प्रादुर्भाव अगदी सहज होतो.

सिफिलिस म्हणजेच उपदंश. हा एक असा विषाणूजन्य आजार आहे जो ओरल सेक्समधून पसरतो.

सिफिलिसमुळे तोंडात जखमा होतात, ज्या संसर्गावाटे जोडीदाराला देखील होऊ शकतात.

अँटीबायोटीकमुळे या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. परंतु यात ताप, घसादुखी, घश्याला खवखव, इत्यादी लक्षणं पाहायला मिळतात.

शारीरिक संबंध रिलेशनशीपमध्ये कितीही महत्त्वाचे असले, तरी कितीही जिवाभावाच्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अचानक हार्ट अटॅक आल्यावर सर्वप्रथम करा 'हे' काम, प्रथमोपचाराने वाचवा रुग्णाचे प्राण

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा