Heater वापरण्याचे 5 साइड इफेक्ट्स

हिवाळ्यात उत्तर भारत थंडीची लाट येते, एवढंच नाही तर महाराष्टातील काही भागात कडाकयाची थंडी पडते.  

अशावेळी स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी लोक हीटर्सचा वापर करतात.

हे हिटर विविध प्रकारात येतात - इलेक्ट्रिक हीटर्स, ऑइल हीटर्स, गॅस हीटर्स आणि इन्फ्रारेड हीटर्स.

पण तुम्हाला माहितीय का की या हिटरचा नकारात्मक परिणाम देखील शरीरावर होतो.  चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

कोरडेपणा : रूम हीटर्समुळे हवेत कोरडेपणा येऊ शकतो ज्यामुळे डोळे, त्वचा आणि घसा कोरडा होऊ शकतो. ओलावा नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

कार्बन मोनोऑक्साइड विषबाधा : गॅस हीटर्स कार्बन मोनोऑक्साइड सोडतात आणि जास्त काळ श्वास घेतल्याने डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होऊ शकते आणि अत्यंत प्रकरणांमध्ये प्राणघातक देखील होऊ शकते.

आगीचे अपघात: रूम हीटर्समुळे संभाव्य आग दुर्घटना होऊ शकते.

त्वचेची जळजळ: रूम हीटरच्या दीर्घ संपर्कामुळे त्वचा कोरडी होऊ शकते ज्यामुळे चिडचिड, लालसरपणा आणि खाज सुटू शकते.

तापमानातील चढउतार: रूम हीटर्समध्ये जास्त वेळ राहिल्याने तुम्ही खोलीतून बाहेर पडताच तापमानातील चढउतारांमुळे सर्दी आणि फ्लू होऊ शकतो.