2023 मध्ये या सेलेब्सचं झालं शुभमंगल सावधान!

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी या दोघांनी 7 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.

अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या3 केएल राहुलसोबतच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होती. केएल राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला विवाहबद्ध झाले.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने 24 सप्टेंबर रोजी खासदार राघव चढ्ढासोबत लग्न केले. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये दोघांचे लग्न पार पडले. या लग्नाची खूपच चर्चा झाली होती.

सत्यदीप मिश्रा आणि मसाबा गुप्ता 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकले. सत्यदीप मिश्रा-मसाबा गुप्ता यांच्या लग्नाच्या पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते.

29 नोव्हेंबर रोजी रणदीप हुडाने त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत मणिपुरी पद्धतीनुसार लग्न केले. रणदीप हुड्डा-लिन लैश्राम यांचे लग्न साधेपणामुळे चर्चेत होते.

स्वरा भास्करने फहाद अहमद सोबत अचानक कोर्ट मॅरेज करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

दृश्यम फेम चित्रपट दिग्दर्शक अभिषेक पाठकने गोव्यात अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयसोबत लग्न केले.

स्वरा भास्करने फहाद अहमद सोबत अचानक कोर्ट मॅरेज करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.