प्रेमात पडलेल्या व्यक्तींना झोप का येत नाही? जाणून घ्या कारण
असं म्हणतात प्रेमात देहभान, झोप सर्वच उडून जाते. एवढेच नाही तर प्रेमात पडलेल्या व्यक्तीला त्याला भुकेच ही भान राहत नाही.
प्रेमात पडलेला व्यक्ती नेहमी त्याच्या आवडत्या व्यक्तीच्या प्रेमात गुंग असतो. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत असेच घडत असते. पण यामागची कारण जाणून घेऊयात.
खरतर प्रेमात पडल्यावर त्या प्रेमाचा प्रभाव आपल्या बुद्धीवर मेंदूवर पडतो आणि लोकांच्या मेंदूत काही बदल घडतात. यामुळे लोक तहान, भूक, झोप सर्वच हरवून बसतात.
जेव्हा कोणती व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा मेंदू डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एड्रनलिन आणि सेरोटोनीन सारखे हार्मोन्स रिलीज करतो.
डोपामाइन हार्मोन तुम्हाला खुश ठेवते. याच हार्मोनमुळे भूक कमी लागणे, झोप न येणे, कामात लक्ष लागणे, चेहऱ्यावर सारखे हास्य उमटणे यासारखे बदल जाणवतात.
प्रेमात पडल्यावर हृदयाचे ठोके वाढू लागतात, तुम्ही आनंदी राहू लागता आणि हे सर्व एड्रनलिन या हार्मोनमुळे होत असते.
तसेच कोणाचा प्रेमळ स्पर्श झाल्यास ऑक्सिटोसिन हा हार्मोन रिलीज होतो. याला कडल हार्मोन्स असे देखील म्हंटले जाते. हा हार्मोन्स जोडप्यामधील प्रेम अधिक वाढवते.
सेरोटोनीन हा हार्मोन जोडीदाराच्या आठवणीत गुंग होण्यास कारणीभूत ठरतो. असं समोर आलं आहे की हा हार्मोन पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो. त्यामुळे स्त्रिया या त्याच्या जोडीदाराच्या आठवणीने जास्त बेचेन होतात.