सापांच्या 'या'  बेटावरून कोणीही परत येत नाही जिवंत!

ब्राझीलजवळील इल्हा दा क्वेनामाडाला सापांचे बेट म्हणतात.

हे ब्राझीलच्या साओ पाउलोच्या किनाऱ्यापासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे.

गोल्डन लान्सहेड वाइपरसह विषारी सापांच्या अनेक प्रजाती येथे राहतात.

येथे सुमारे दोन ते चार हजार साप आहेत, प्रत्येक 75 चौरस मीटरमध्ये एक साप आढळतो.

असे म्हटले जाते की जो कोणी बेटाच्या आत गेला तो जिवंत परत येऊ शकत नाही.

12 हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी वाढल्यामुळे हे बेट ब्राझीलच्या भूमीपासून वेगळे झाले होते.

त्यामुळे येथील सापांची संख्या  वाढू लागली.

येथे साप झाडांवर चढायला शिकले आणि पक्षी खाऊ लागले.

येथे जाण्यास बंदी आहे, येथे येणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असते