Snake Fact : साप जीभ का बाहेर काढतो? कारण माहितीय?
साप हा खूप धोकादायक प्राणी आहे. ज्यामुळे लोक त्याच्यापासून लांबच रहातात.
कारण त्याचं विष माणसाचा जीव घेऊ शकतो.
एवढंच नाही तर त्याच्यामुळे माणसाला पॅरालिसीसचा देखील धोका आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे.
पण सापाबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही.
साप हा मांसाहारी जीव आहे. तो उंदीर, पाल, अन्य कीटक खातो. तसेच दूध हे सापाचे अन्न नाही.
याशिवाय सापाला कान नसतात आणि त्याला लांबचे ही दिसत नाही. सापाची स्मरण शक्ती अल्प असते.
शिवाय तुम्ही अनेकदा सापाला जीभ बाहेर काढताना पाहिलं असेल पण तो असं का करतो हे माहित नसेल.
खरंतर साप जीभेने वास घेतो. त्यामुळे तो जीभ बाहेर काढून आसपासच्या प्राण्यांचा अंदाज घेत असतो.
यामुळे त्याला आजूबाजूला हालचाल होत असल्यास जाणवते. कंपनातूनही तो सभोवताली कोणी असल्याचे जाणून घेतो.