नवरी नटली गं... सोनालीचा सुंदर पेहराव!

नवरी नटली गं... सोनालीचा सुंदर पेहराव!

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने लोकांनां घायाळ करत असते.

सोनालीच्या लग्नाला चार वर्ष उलटले आहेत, पण नुकतंच तिचे नववधूच्या वेशातील फोटो समोर आले आहेत.

या फोटोत पिवळी साडी, सुंदर दागिने आणि डोक्याला मुंडावळ्या अशा पारंपरिक नववधूच्या वेशात सोनाली दिसत आहे.

या लुकमध्ये सोनालीनं पारंपरिक वेशाला मॉडर्न ट्विस्ट दिला आहे.

तिच्या कमरपट्ट्यानं सर्वाधिक लक्ष वेधलं आहे.

सोनालीने तिच्या ‘बारा वार’ साडीवर ‘सप्तपदी’ असं लिहिलेला वेलवेटचा कमरपट्टा लक्षवेधी ठरत आहे.

एका फॅशन शो साठी अभिनेत्रीनं हा लूक केला होता. या पारंपरिक लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत होती.

आपल्या लाडक्या अप्सरेला नववधूच्या वेशात पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सोनालीचे हे फोटो व्हायरल होत असून चाहते या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.