देशी गाईच्या दुधाचं इन्स्टंट आईस्क्रीम

देशी गाईच्या दुधाचं इन्स्टंट आईस्क्रीम

आईस्क्रीम म्हंटल की सगळ्यांच्याच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

आईस्क्रीम हे अनेक फ्लेवरमध्ये उपलब्ध असतं त्यासाठी केमिकलही वापरतात.

पुण्यातील शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शुद्ध देशी गाईच्या दुधापासून आईस्क्रीम बनवलंय.

विशेष म्हणजे केमिकल मुक्त असणाऱ्या या इन्स्टंट आईस्क्रीममध्ये 12 फ्लेवर आहेत. 

तांत्रिक देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये गोपालन करून हे आईस्क्रीम बनवलं जातं. 

देशी गाईचं दूध आटवून त्यात सिझनल फळे ऍड करून हे आईस्क्रीम तयार केलं जातं. 

यामध्ये ओरिओ, बोर्बन, बनाना, चिकू, आंबा, अंजीर, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आदी 12 फ्लेवर मिळतात. 

अवघ्या 50 रुपयांत मिळणारे आईस्क्रीम इन्स्टंट बनत असल्याने त्याचे पार्सल नेता येत नाही. 

दिल्लीतील फेमस स्ट्रीड फूड पुण्यात