हे मसाले खाल्ल्यास उजळेल भाग्य

हे मसाले खाल्ल्यास उजळेल भाग्य

स्वयंपाकघरात रोजच्या जेवणात वापरले जाणारे मसाले हे जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. 

मसाल्यांचा वापर केल्याने आपले भाग्य उजळवू शकते, असे कोल्हापूरचे ज्योतिषी अरविंद वेदांते सांगतात.

ज्याच्या कुंडलीतील ग्रहांमध्ये सूर्य असेल, त्यांनी मिठाचे नियमित सेवन केले पाहिजे. 

ग्रहांतील सूर्याला मीठमिश्रित पाणी अर्पण केल्यामुळे सूर्य ग्रह कुंडलीमध्ये बलवान राहतो.

जिरे हा पदार्थ राहू आणि केतूशी संबंधित असून याच्या सेवनाने सुख, शांती, समृध्दी मिळते. 

राहू केतू संबंधित समस्या असतील तर दर मंगळवारी दह्यामध्ये जिरे मिसळून त्यांचे सेवन करावे.

लाल मिरची मंगळ ग्रहाशी संबंधित असून ती वापरल्यास मंगळाचा त्रास कमी होतो. 

कुंडलीमध्ये मंगळ अनिष्ट किंवा त्रासदायक असेल, तर लाल मिरची दान करणे फायद्याचे ठरते. 

रोज धने किंवा कोथंबीरचे सेवन आरोग्यासोबत कुंडलीतील ग्रहांसाठीही फायदेशीर आहे. 

ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित असून याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.

देशात पहिल्यांदाच पिकतेय पांढरी स्ट्रॉबेरी