'या' मार्केटमध्ये मिळतात जगभरातले मसाले

आपल्या देशात अनेक दुर्मीळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचं उत्पादन घेतलं जातं.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक असं मार्केट आहे, जिथे जगभरातील मसाले अगदी स्वस्त मिळतात.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे.

या बाजारात फळं, भाज्या, मसाले, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी घाऊक दरात मिळतात.

तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकानं आहेत.

मिरची, काश्मिरी मिरची, धने, हळद, दालचिनी, वेलची, जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबरं, चिंच, इत्यादी प्रकारचे मसाले या बाजारात मिळतात.

हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे.

जगभरातील परफ्युमची करा 'इथं' खरेदी