पावसाळ्यात पडणाऱ्या विजांपासून असं राहा सुरक्षित!
पावसाळ्यामध्ये जोराचा वारा आणि विजांचा कडकडाटही होतो. जो धोकादायक आहे.
पावसाळ्यामध्ये येणारा वादळ वारा आणि विजांचा कडकडाट अनेकांचा बळी घेतो.
पावसाळ्यात वादळ वाऱ्यात आणि विजांचा कडकडाट सुरु असताना काही गोष्टीं टाळाव्यात. जेणेकरुन कुठलीही हानी होणार नाही.
घराबाहेर असाल तर लगेच तुमचा स्मार्टफोन बंद करा.
वीज पडतानाही अनेकजण स्मार्टफोनचा वापर करतात. हे घातक ठरू शकतं.
विजा कडाडत असताना इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत टाळावं.
गाडीत असाल तर गाडीवरही वीज पडू शकते, अशा परिस्थितीत शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावं.
या काळात लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरणं टाळावं. कारण या इलेक्टॉनिक वस्तू वीज ओढून घेतात.
तुम्ही बाहेर असाल तर झाडाखालीही थांबू नये. सोसाट्याचा वारा आणि विजांमुळे झाड पडतं त्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.