नवीन वर्षाचं गिफ्ट! या स्किम्सच्या व्याजदरांमध्ये झाली वाढ
छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठी भेट मिळालीये.
केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे.
FY24 च्या चौथ्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवर व्याजदर 0.20% वाढला आहे.
आता SSY वर 8.2 टक्केच्या हिशोबाने व्याज मिळेल.
3 वर्षांच्या डाइम डिपॉझिटवर व्याजदर 0.10% वाढवण्यात आलंय.
आता 3 वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर 7.1% व्याज मिळेल.
अनेक योजनांवर नवीन व्याजदर 1 जानेवारी 2024 पासून लागू आहेत.
इतर छोट्या बचत योजनांसाठी दर पहिल्याप्रमाणेच असतील.
पीपीएफवरील व्याजदरही 7.1% कायम ठेवण्यात आलेय.