महागड्या गाड्या ते लक्झरी लाईफस्टाईल SRH ची मालकीण काव्या मारन जगते असं आयुष्य

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाची मालकीण असणारी काव्या मारन ही ऑक्शनचा टेबल असो अथवा मैदानात चिअर करणं असो नेहमीच आपल्या टीमच्या पाठीशी भक्कम उभी राहताना दिसते.

काव्या मारन ही सनरायजर्स हैदराबाद टीमची सीईओ असून ती 33 वर्षांची आहे.

काव्या मारनचे वडील कलानिधी मारन हे सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.

2019 मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये काव्या मारनचा समावेश करण्यात आला. सन म्युझिक आणि सन नेटवर्कच्या एफएम चॅनेलसाठीची जबाबदारी तिच्याकडेच आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार काव्या मारनची नेटवर्थ जवळपास 409 कोटी असून तिला वर्षाला जवळपास 1.09 कोटी रुपये इतका पगार मिळतो.

काव्या मारनच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी गाड्या आहेत.

यात 2.13 कोटींची BMW i7, 6 कोटींची Bentley Bentayga EWB, 12.2 कोटींची Rolls-Royce Phantom VIII EWB आणि 4.5 कोटींच्या Ferrari Roma या गाड्यांचा समावेश आहे.

चेन्नई येथे मारन कुटुंबाचं आलिशान घर सुद्धा आहे.

काव्याच्या वडिलांची एकूण नेटवर्थ ही 23 हजार कोटींच्या घरात आहेत.

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. न्यूज १८ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. 

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा