डेंग्यूचा ताप कसा ओळखायचा?
पावसात साचलेले घाण पाणी, कुलर अशा ठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो.
मादी एडिस डास चावतो तेव्हा डेंग्यूचा विषाणू आपल्या शरीरात शिरतो.
मादी एडिस डास चावल्यानंतर सुमारे 5 दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसून येतात.
क्लासिकल डेंग्यू फिव्हर हा साधा डेंग्यू ताप रुग्णाला 5 ते 7 दिवस टिकू शकतो.
यामध्ये थंडी वाजून ताप येणे, सांधे, स्नायू, डोकं दुखणे, अशक्तपणा, भूक न लागणे, मळमळणे
डोळ्यांच्या मागच्या भागात वेदना, घशात किंचित वेदना, शरीराच्या काही भागांवर पुरळ उठणे, अशी लक्षणं दिसतात.
डेंग्यू हेमोरेजिक फीवर यामध्ये तापासह शरीराच्या काही भागात रक्तस्राव होऊ शकतो.
यामध्ये साध्या डेंग्यू तापाच्या लक्षणांसोबत शौचास किंवा उलट्यांमध्ये रक्त येणे.
नाक, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर गडद निळे काळे डाग.
डेंग्यू शॉक सिंड्रोम तापामध्ये 'शॉक' सारखी स्थिती किंवा काही लक्षणं दिसतात.
खूप तापातही त्वचा थंडच असणं, अस्वस्थता, रुग्ण हळूहळू बेशुद्ध होणे.