उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी!

पाणी प्या : उन्हाळयात पाणी पिणं सर्वाधिक आवश्यक आहे. हे सर्वांना माहित आहेच. 

पाणी पिण्यासाठी रोजचे लक्ष्य सेट करा आणि दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्या. 

अल्कोहोल किंवा कॅफिन टाळा : मद्य किंवा कॅफीनयुक्त पेये शरीराला डिहायड्रेट करतात.

लिंबूपाणी किंवा फळांचा रस यांसारख्या उन्हाळ्यातील शीतपेयांचा पर्याय निवडा.

त्याचबरोबर उन्हाळी खास जसे की कलिंगड खरबूज यांचाही आहारात समावेश करा. 

आपल्या आहारात काकडी आणि टोमॅटो देखील सामील करण्याचा प्रयत्न करा.

शरीराचे तापमान सांभाळा : बाहेरून आल्यावर लगेच एसी चालू करू नका. तुमचे शरीर सामान्य तापमानावर येऊ द्या. 

बाहेर आल्या आल्या एसी वापरण्याऐवजी एखादे रिफ्रेशिंग ड्रिंक प्या. 

लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या : लघवीचा रंग तुमच्या शरीराबद्दल बरेच काही सांगून जातो.

जर रंग नेहमीपेक्षा जास्त गडद असेल तर ते डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते.