हिवाळ्यासाठी बेस्ट आहे हा मसाला चहा, झटपट करा तयार

हिवाळ्यात अनेकांना दिवसातून अनेकदा चहा प्यायची सवय असते.

काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा चहा तयार करणं आवडतं.

तुम्हालाही चहा आवडतो का? तर हा मसाला चहा ट्राय करु शकता.

चहा मसाला तयार करण्यासाठी हिरवी वेलची, बडीशोप, मिरे घ्या.

सोबतच लवंग, दालचिनी, काळी वेलची, सुंट, जायफल आणि चक्रफूल घ्या.

सर्व  थोडं भाजून मिक्सरमधून बारीक करा.

दूध, पाणी, साखर आणि चहापत्ती टाकून नॉर्मल चहा बनवाल.

अखेरीस चहामध्ये मसाला टाका आणि एक मिनिट उकळून गाळून घ्या.

हिवाळ्यात टेस्टी आणि हेल्दी मसाला चहा तयार आहे.