याबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, 'मी सेटल आहे. मी आता माझ्या आयुष्यात सेटल आहे.'
ती पुढे म्हणाली, 'लग्न कधी करणार आहे असं विचाराल तर परत गडबड आहे. मी खरंच सेटल आहे. कुणाशीही लग्न करणं हे माझ्या सेटल होण्याची कारणं नाहीयेत.'
'मी करिअर करतेय, मी अभिनय करतेय, मी निर्मितीही करतेय. मी व्यावसायिकादेखील आहे. मी खूप काही करतेय असं वाटतंय मला. त्यासाठी मला कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही.' असं उत्तर तेजस्विनीने दिलं आहे.
तेजस्विनीने मांडलेलं हे मत सध्या चर्चेत आलं आहे.
तेजस्विनीने २०१२ मध्ये भूषण बोपचेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला.