दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड!

काहींचे वय हे फक्त आकडा असतो. त्यांचे कार्य पाहून संपूर्ण जगाला आश्चर्य वाटतं.

मुळचा ठाण्याचा आणि सध्या मलेशियात राहणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानंही असाच एक रेकॉर्ड केलाय.

ज्या वयात मुलांना अक्षरओळखही पुरेशी नसते. सर्व गोष्टींसाठी मोठ्यांवर अवलंबून राहावं लागतं.

त्यावयात त्यानं केलेल्या रेकॉर्डची दखल जगानं घेतलीय.

समर्थ कारंडे असं या चिमुरड्याचं नाव आहे. तो सध्या 2 वर्ष 11 महिन्यांचा आहे.

तो या लहान वयात फक्त 7 मिनिटांमध्ये जवळपास 401 इंग्रजीचे शब्द वाचतो.

त्याच्या या हुशारीची दखल कलाम वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतलीय.

यापूर्वी समर्थच्या वयाच्या एका मुलानं 14 मिनिटात 380 इंग्रजी शब्द वाचले होते.

समर्थनं 7 मिनिटात 401 शब्द वाचत त्या रेकॉर्ड ब्रेक केला.

समर्थच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झालीय.