या जोडप्यांच्या घटस्फोटानं सगळ्यांनाच बसला धक्का!

ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरतशी लग्न केलं होतं. आता 12 वर्षानंतर दोघांचा संसार मोडला आहे.

हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटानं सगळ्यांनाच धक्का बसला होता.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

फरहान आणि अधुना यांच्या लग्नाला15 वर्षे झाली होती पण 2016 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा तर लग्नानंतर तब्बल 24 वर्षांनी संसार मोडला आहे.

अभिनेत्री कल्की कोचलिन आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यांच्या देव डी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. पण काही काळातच त्यांचं लग्न मोडलं.

ईशा कोप्पीकर आणि टिमी नारंग यांचा नुकताच घटस्फोट झाला. त्यांना नऊ वर्षांची मुलगी आहे.

अर्जुन रामपालने लग्नाच्या 21 वर्षांनंतर पत्नी मेहर जेसियापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.