'या' गोष्टींचा वास येताच दूर पळतात साप
साप किंवा नाग नुसता दिसला तरी माणसांचा भीतीने थरकाप उडतो.
अशा स्थितीत माणूस साप, नागाला पळवून लावण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात.
परंतु निसर्गात अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या वासाने कितीही विषारी साप असू देत तो दूर पळून जातो.
प्राण्यांशी संबंधित a-z-animal या वेबसाईटने या संदर्भात 14 वस्तूंचा उल्लेख केला आहे.
प्रामुख्याने लसूण आणि कांदा, पुदिना, लवंग, तुळस, दालचिनी, व्हिनेगर, लिंबू आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अमोनिया वायू यांचा समावेश आहे.
अनेकवेळा सापांना धुरामुळे ही त्रास होतो. त्यामुळे धूर करूनही सापांना दूर पळवता येऊ शकत.
सापांना या सर्व गोष्टींचा वास अजिबात सहन होत नाही.
त्यामुळे ते या वस्तूंपासून दूर पळतात.
साप त्याच्या जिभेच्या माध्यमातून वास ओळखतो. जर तुम्ही या वस्तू घरात ठेवल्या तर साप तुमच्या घराकडे फिरकणार देखील नाहीत.