ट्रेनमध्ये झोपण्यासाठीही आहेत नियम, तुम्हाला माहितीय का?
ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांनाही एका प्रश्नाचं उत्तर माहित नसेल. ते म्हणजे ट्रेनमध्ये किती तास झोपू शकतो?
ट्रेनने प्रवास करताना आतमध्ये बसण्याचे आणि झोपण्याचेही काही नियम असतात. ज्याविषयी फार कमी लोकांना माहित असेल.
तुम्हीही ट्रेनने लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असाल तर काही नियम माहिती असणं गरजेचं आहे.
पहिल्यांदा ट्रेनमध्ये प्रवाशांना 9 तास झोपण्याची सुविधा दिली जायची.
नव्या नियमांनुसार, प्रवासी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपू शकतात.
रेल्वेनं जुना नियम बदलून नव्या नियमानुसार प्रवाशांना 8 तास झोपण्याचा नियम बनवलाय. हा नियम प्रत्येक ट्रेनसाठी आहे.
रेल्वेनं हा झोपण्याचा नियम यासाठी बनवला आहे जेणेकरुन लांबच्या पल्ल्याचे प्रवासी आरामात झोपू शकतील.
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेचा वेळ झोपेसाठी योग्य मानला जातो.
बसणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हे नियम आहेत.