ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जाणून घेऊया कन्या सासरी चालली असताना तिला कोणत्या गोष्टी देणं टाळायला हवं.
सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये. याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात.
लोणच्याची चव आंबट असल्यानं ते भेट म्हणून देणं योग्य नाही.
मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असे मानले जाते की, जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो.
मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते, असे म्हणतात.
सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात, असे मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)