Vastu Tips: या वास्तु उपायांनी वाढेल घरातील सुख-शांती 

घरात सुख-समृद्धी कायम राहावी, यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत.

 घरातील वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्या किंवा घराची रचना चुकीची असेल तर वास्तुत नकारात्मक ऊर्जा वाढते.

घरात नकारात्मकता वाढवणाऱ्या 5 गोष्टी नेमक्या कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊया.

घरात बऱ्याचदा कोळ्याचं जाळं लागतं. घरात जाळ्या-जळमटं वाढणं अशुभ मानलं जातं. 

कोऴ्याची जाळी हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. यामुळे घरात मानसिक अशांतता वाढते. 

वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, त्या घरातही वास्तुदोष निर्माण होतो.

ईशान्य दिशेला तुळस लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

वास्तुशास्त्रानुसार, घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अस्वच्छता होय. 

काही लोकांना घरात खराब आणि वापरात नसलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.