संपूर्ण नवरात्रीच्या पूजेसाठी या गोष्टी हव्याच, लक्षात ठेवा यादी

यंदा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.

 काही साहित्याशिवाय नवरात्रीतील पूजा अपूर्ण मानली जाते.

घट (कलश): नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा करण्यापूर्वी कलशाची स्थापना करण्याची परंपरा आहे.

पंच पल्लव : कलश स्थापनेसाठी पंच पल्लव आवश्यक मानले जातात.

श्रृंगार (मेकअक) साहित्य : देवी दुर्गेला श्रृंगार करायला खूप आवडतो, असे मानले जाते. म्हणून नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला 16 श्रृंगार साहित्य नक्की अर्पण करा.

मातेचा ध्वज: दुर्गापूजेचा लाल ध्वज न विसरता फडकवावा. हा पूजेतील नियम आहे.

बार्ली (जव) - नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीच्या कलशात बार्ली पेरण्यासाठी आवश्यक असते.

वंदनवार (तोरण) : घराच्या प्रवेशद्वारावर अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांपासून बनवलेला तोरण अवश्य लावा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही