माघी पौर्णिमेच्या दिवशी करू नये या गोष्टी; नाहक त्रास सोसावा लागेल 

माघ महिना दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 

माघी पौर्णिमेला विषेष महत्त्व आहे.

या दिवशी गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे.

यंदा माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारीला येत आहे. त्यादिवशी काही कामं टाळावी.

या दिवशी आपण केस आणि नखे कापू नयेत.

माघ पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत.

या दिवशी आपल्याकडून कोणा ज्येष्ठ-मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नये.

पौर्णिमेला सकाळी लवकर उठावे, उशिरापर्यंत झोपू नये.

यामुळे देवी लक्ष्मी कोपू शकते आणि आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते.

उज्जैनचे ज्योतिषी पंडित रवी शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे.