105 रुपयांना विकलं जातंय 4 बेडरूमचं घर

4000 चौरस मीटरच्या घराची किंमत इतकी कमी का आहे असा प्रश्न लोकांना पडला आहे.

एवढंच नाही तर खरेदीदाराला 7 लाख रुपयांचे बोनस बक्षीस देखील मिळेल.

इंग्लंडच्या पॅटिनसन इस्टेट एजन्सीद्वारे घराचा लिलाव केला जात आहे.

न्यूकॅसलमधील घरामध्ये 4 बेडरूम, दोन स्नानगृह, एक विश्रामगृह आणि एक स्वयंपाकघर आहे.

घरासोबत बाग आणि स्वतंत्र गॅरेज ही आहे.

एवढे असूनही त्याची सुरुवातीची किंमत फक्त 105 रुपये ठेवण्यात आली आहे.

खरं तर घर मोठं आहे, पण त्याची अवस्था फार वाईट आहे.

दरवाजे, खिडक्या, भिंती, फरशी खचून गेली असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.

घरात एक बेबी ग्रँड पियानो आहे, ज्याची किंमत 7 लाख आहे, ते घर खरेदी करणाऱ्याला मिळेल.